मुंबईचा बचाव मराठी माणसांनी केला- मुख्यमंत्री

February 2, 2010 11:42 AM0 commentsViews: 3

2 फेब्रुवारी26/11च्या हल्ल्याच्या वेळी मुंबईचा बचाव सर्वांनी केला त्यात मराठीही होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. मुंबईवरचा हल्ला रोखणारे युपी आणि बिहारी कमांडो होते, असं राहुल गांधी म्हणालेत. त्यावर शिवसेनेने टीकेची झोड उठवली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांची भूमिका देशाला आणि महाराष्ट्राला जोडणारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना आणि मनसेकडे मुद्दे उरलेले नाहीत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

close