मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटला आग, 70 दुकानं जळून खाक

October 25, 2015 11:49 AM0 commentsViews:

fire at Crawford Market

25 ऑक्टोबर : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आज (रविवारी) पहाटे भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यात आग्निशमन दलाला यश आलं आहे.

क्रॉफर्ड मार्केटमधल्या फळ बाजाराला पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. यामध्ये 70 दुकाने जळून खाक झाल्याचं कळते. आग पहाटेच्या वेळी लागल्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाचे तब्बल 11 फायर इंजिन आणि 7 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर अखेर अग्निशमदन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

दरम्यान, आगीची माहिती कळताच मुंबई मनपा आयुक्त अजय मेहता, मुख्य अग्निशमन अधिकारी ओ.पी. रहांगदळे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. या आगीमुळे काही काळ परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या आगीचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरीही शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close