शिवसैनिकांनी उधळला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम

October 25, 2015 12:43 PM0 commentsViews:

äÖÖêÛúÝÖêæÖê»Ö ‹¯Ö¦îü

25 ऑक्टोबर : गुडगावमध्ये एका ओपन एअर थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळून लावला आहे. त्यासोबतच स्टेजवर लावण्यात आलेला पाकिस्तानचा झेंडाही यावेळी उखडून फेकण्यात आला. या गोंधळामुळे आयोजकांना काही वेळ हा कार्यक्रम थांबवावा लागला.

शनिवारी रात्री पाकिस्तानी कलाकारांचा नाटकाचा शो आयोजित करण्यात आला होता. हा शो सुरू असतानाच पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या आणि हा कार्यक्रम बंद पाडला. या शोबाबत पोलिसांना आधीच सुचना देण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आलेही होते, मात्र काही वेळातच ते निघून गेले. त्यानंतर हा गोंधळ झाला, असा आरोप आयोजकांनी केला आहे. स्टेजवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे झेंडे लावण्यात आले होते. दोन्ही देशांमधील संबध सुधारावेत या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असेही आयोजकांनी नमूद केले. तर, आमच्याकडे निषेध करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मात्र, आम्ही शांतीपूर्वक रित्या या कार्यक्रमाला निषेध केला असून पाकिस्तानी कलाकार जिथे पाय ठेवतील तिथे जाऊन आम्ही निषेध करू अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.

दरम्यान, याआधी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावरूनही शिवसैनिकांनी राडा केला होता. कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला होता. पाठोपाठ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात मुंबईत होणारी चर्चाही शिवसेनेच्या आंदोलनामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता गुडगावातही शिवसैनिक धडकल्याने पाक कलाकारांच्या कार्यक्रमांना असलेल्या धोका आणखीनच वाढला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close