नांदेडच्या किनवट तालुक्यात 45 जणांना शिळ्या अन्नामुळे विषबाधा

October 25, 2015 3:24 PM0 commentsViews:

»ÖÖê»ÖËÖË

25 ऑक्टोबर : नांदेडच्या किनवट तालुक्यातील मांडवा गावात एका खाजगी कार्यक्रमात शिळं अन्न खाल्याने गावातील 45 जणांना विषबाधा झाली आहे. रुग्णांवर किनवट इथल्या गोकुंदा रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.

मांडवा गावात एका खाजगी कार्यक्रमातील उरलेलं शिळं अन्न ग्रामस्थांमध्ये वाटण्यात आलं. जेवनानंतर 45 ग्रामस्थांना उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि त्यांना चक्कर आली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुग्णांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++