नागपुरात 10 हजार मुलांची संगीत खुर्ची

February 2, 2010 1:19 PM0 commentsViews: 6

2 फेब्रुवारीनागपुरातील यशवंत स्टेडियमवर आज तब्बल 10 हजार मुले संगीत खुर्ची खेळली. गो ग्रीन नावाचा हा अनोखा खेळ रंगला ग्लोबल वार्मिंगच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी. यात 40 शाळांमधून 10 हजार 129 मुले सहभागी झाली. 1987मध्ये सिंगापुरात 8 हजार 238 विद्यार्थी अशी संगीत खुर्ची खेळली होती. पण नागपुरातल्या मुलांनी आज सिंगापूरचा विक्रमही मोडला. ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल आणि ऑरेंज सिटीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

close