फुटीच्या भीतीमुळे शिवसेना अजून सत्तेत – राज ठाकरे

October 25, 2015 9:05 PM0 commentsViews:

RAJ RALLy

25 ऑक्टोबर : पक्षात फूट पडेल या भीतीमुळेच शिवसेना अजून सत्तेत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणमधल्या प्रचारसभेत शिवसेनेवर केली आहे. भाजप शिवसेनेला विचारत नाही पण फुटीच्या भितीमुळं शिवसेना सत्तेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कल्याण-डोंबिवलीतल्या प्रचाराचा आजचा शेवटचा रविवार आहे. आता प्रचाराला फक्त पाच दिवस राहिले असल्यानं सर्वच पक्षांचे स्टार नेते मोठ मोठ्या रॅलीज् काढून जोरदार प्रचार करत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही आज (रविवारी) कल्याण पूर्व इथे सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली.

इतर पक्षांचे नेते कल्याण डोंबिवलीत येतांना दिसत नाहीत, कारण कामंच केली नाही. त्यामुळे सांगायला त्या पक्षांकडे काही नाहीत असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तर अनेक अपमान सहन करुन शिवसेना सत्ता सोडायला तयार नाही, एवढच काय तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक जागा शिवसेना मिळवू शकलेली नाही असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगवाला. आम्ही नाशिकमध्ये बांधण्यात येणार्‍या संग्राहलयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

लोकमान्य टिळकांना आणि सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्या सुटणार आहेत का? असा टोलाही त्यांनी शिवसेनेला हाणला आहे. त्याचबरोबर महापालिकेला मिळालेले 15 हजार कोटी रुपये कुठे गेले असा सावल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. याशिवाय भारत-पाकिस्तान यांच्यातील समझौता एक्स्प्रेस बंद करून दाखवा असं आव्हानही राज ठाकरेंनी शिवसेनेला दिलं आहे.

दरम्यान रविवारचा सुटीचा दिवस असल्यानंउमेदवारांनी सोसायट्यांमध्ये जावून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीही घेतल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close