‘चितळकरचे रॅगिंग झालेच नाही’

February 2, 2010 3:39 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीप्रशांत चितळकर रॅगिंगप्रकरणी पुण्यातील डीईएस लॉ कॉलेजने अहवाल सादर केलाय. आत्महत्या केलेल्या प्रशांत चितळकरचं रॅगिंग झालेच नाही, असे या अहवालात समितीने नमूद केले आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु आणि राहुरी पोलीस स्टेशनला हा अहवाल पाठवण्यात आलाय. सीनिअर विद्यार्थ्यांच्या रॅगिंगला कंटाळून प्रशांतने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलेला आहे. राहुरी इथे राहणारा प्रशांत पुण्यात लॉ कॉलेजच्या दुस-या वर्षात शिकत होता. काही दिवसांपूर्वी त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्यात कॉलेजचे प्राचार्य, वर्गशिक्षक आणि एका वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश आहे. या समितीनेच प्रशांतचे रॅगिंग झालेच नव्हते असा अहवाल दिलाय.

close