लोहगाव विमानतळाचा होणार विस्तार – गडकरी

October 26, 2015 1:53 PM1 commentViews:

gadkari news26 ऑक्टोबर : पुण्यातील लोहगाव विमानतळ हे संरक्षण विभागाच असल्याने नागरी वाहतुकीला अनेक अडचणींना सामोरे जाव लागतंय. मात्र, याच विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलाय. या निर्णयामुळे पुन्हा एकदा खेड विमानतळाचा प्रस्ताव बारगळला गेलाय.

लोहगाव विमानतळाची संरक्षण विभागाची 15 एकर जागा विस्तार करण्यासाठी वापरण्याला केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मान्यता दिली आहे. विमानतळाची प्रतीक्षाच पुणेकरांना करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा असा आदेश वजा निर्णय गडकरींनी दिलेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vinayakrao Bhavsar

    Maharashtra Govt. sevanivruttacha apman karit ahe. Jesth nagrik age 60 kele nahi 65 kele. Diwali purvi D.A. arrears dila nahi.

close