उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला

October 26, 2015 3:25 PM0 commentsViews:

DELHI EARTHQUAKE

26 ऑक्टोबर : उत्तर भारतासह पाकिस्तान आज (सोमवारी ) भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भारतात भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे, तर पाकिस्तानात 8.01 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील हिंदूकूश हे या भूकंपाचे केंद्रबिंदू आहे.

उत्तर भारतातील दिल्ली, श्रीनगर, हिमाचलप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पाकिस्तानातील लाहोर, इस्लामाबादसह अनेक भागांत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून अनेक भागातील इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिल्लीतील मेट्रो सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close