व्हॅलेंटाईन डेसाठी पुणे पोलीस सज्ज

February 2, 2010 4:01 PM0 commentsViews: 7

2 फेब्रुवारीव्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारा संभाव्य 'राडा' टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केलीय. 3 फेब्रुवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश काढलाय. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनवर गदा येणार आहे. पण यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने संस्कृती रक्षणासाठी सज्ज झालेल्यांचा हिरमोड झाला आहे. पण हा आदेश म्हणजे मॉरल पोलीसिंग नाही तर प्रचलित पोलीसी कायद्याची अमलबजावणी आहे, असा दावा सहपोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी केलाय. या आदेशानुसार व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तसेच नंतरही गटागटाने जमून शांतता भंग करणे, ढोल-ताशे वाजवणे, मोठ्या आवाजाचे भोंगे लावणे, विक्षिप्त हावभाव करणे, दारु पिऊन एकमेकांच्या अंगावर रंग किंवा गुलाल उधळणे, रहदारीला अडथळा करणे असे प्रकार केल्यास कारवाई केली जाणार आहे.

close