कोण आहे छोटा राजन?

October 26, 2015 6:11 PM0 commentsViews:

26 ऑक्टोबर : कुख्यात डॉन छोटा राजनला इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलं आहे. 55 वर्षीय छोटा राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आहे. गेल्या दोन दशकापांसून सुरक्षा यंत्रणांना तो सतत गुंगारा देत होता. इंटरपोलनेही राजनचा मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला होता. अनेक गँगवॉरमध्ये छोटा राजनचा हात आहे. एक नजर टाकूयात छोटा राजनच्या पार्श्वभूमीवर.. 

कोण आहे छोटा राजन?

- छोटा राजनचं संपूर्ण नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे
– त्याचा 1959 रोजी मुंबईतील चेंबूरमधल्या टिळक नगर इथे झाला. तिथेच तो लहानाचा मोठा झाला.
– त्याचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी
– छोटा राजनने 80 च्या दशकात चेंबूरमधल्या सहकार सिनेमाबाहेर ब्लॅकने तिकिटं विकायला सुरुवात केली.
– छोटे मोठे गुन्हे करत तो बडा राजनच्या संपर्कात आला
– तेव्हा चेंबुर भागात राजन नायर उर्फ बडा राजनची दादागिरी चालायची.
– बडा राजनशिवाय त्या काळात दाऊद इब्राहिम, हाजी मस्तान, करीम लाला आणि वरद राजन यांची मुंबईत दादागिरी होती.
– राजेंद्र निकाळजे हा बडा राजनच्या मार्गदर्शनाखाली धमकावणे, खंडण्या मागणे , मारामार्‍या करणे असे छोटे छोटे गुन्हे करू लागला.
– चेंबूरच्या टिळकनगरमध्ये त्याची दहशत वाढू लागली. पुढे तो 1980 नंतर हत्येच्या सुपार्‍या घेऊ लागला आणि सोन्याची तस्करी करू लागला.
– बडा राजन आणि छोटा राजन यांनी बराच काळ दाऊद इब्राहिमसाठी काम केलं. राजन दाऊदच्या टोळीचा सदस्य होता.
– बडा राजनची हत्या झाल्यानंतर छोटा राजन दाऊद इब्राहिमच्या जवळ गेला.
– अगदी थोड्याच दिवसात तो दाऊदचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाला.
– दाऊदने मुंबईत साखळी स्फोट घडवल्यानंतर 90च्या दशकात छोटा राजन आणि दाऊद यांच्यात ठिणगी पडली
– दाऊदच्या माणसांची हत्या केल्याचा छोटा राजनवर आरोप
– त्यानंतर दाऊद आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांनी किमान तीन वेळा छोटा राजनला संपवण्याचा प्रयत्न केला
– 2002 साली बँकॉकमध्ये छोटा राजनवर जीवघेणा हल्ला झाला
– बँकॉकच्या रुग्णालयात उपचार घेत असताना राजनने अचानकपणे पलायन केलं
– हल्ल्याचा बदला म्हणून राजनने विनोद शेट्टीला मुंबईत संपवलं
– सुनील सोन याने दाऊदला माहिती दिल्याचा संशय आल्याने छोटा राजनने त्याचाही खून केला
– 2003 मध्ये छोटा राजन गँगने शरद शेट्टीची हत्या केली
– हत्येचा प्रयत्न, हत्या, प्राणघातक हल्ला, कट, खंडणी, संघटित गुन्हेगारी, आर्म्स अक्ट, बेकायदा शस्त्र बाळगणं इत्यादी आरोप
– पत्रकार जे डे यांच्या हत्येचा आरोप छोटा राजनवर आहे
– सुजाता ही छोटा राजनची पत्नी असून त्यांना अंकिता, निकीता आणि खुशी या तीन मुली आहेत
– छोटा राजनच्या आयुष्यावर कंपनी नावाचा सिनेमा बनला आणि तो प्रचंड गाजला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close