टंचाईग्रस्त भागासाठी राज्य सरकारची विशेष योजना

February 2, 2010 4:52 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीपावसाने दगा दिल्याने अर्ध्याहून अधिक राज्यावर दुष्काळाचं संकट ओढवलंय. राज्यातली 20 हजार 240 गावं टंचाईसदृश्य म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांमध्ये खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 50 पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे या गावांमध्ये सोयी सवलती लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यानुसार या गावांमध्ये शेतक-यांची कर्जवसुली थांबवणे, थकीत कर्जाचे पुनर्गठन करणे, शाळांची फी माफ करणे आदी योजना राबवण्यात येतील. यात पुणे विभागातील 664, नाशिकमधील 2041, अमरावती विभातील 3,474 नागपूर विभागातील 6,818 तर कोकणातील 2 गावांचा समावेश आहे. टंचाईग्रस्तांसाठी विशेष कामे करुन घेण्याची जबाबदारी विभागीय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी ही माहिती दिलीय. दरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केलीय. राज्यसरकारने दुष्काळ जाहीर करण्यास उशीर केला. तसेच टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

close