शाहरुख खानला ‘ईडी’ने पुन्हा बजावला समन्स

October 27, 2015 12:41 PM0 commentsViews:

srk_ed27 ऑक्टोबर : बॉलिवूडचा अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानला ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने नव्यानं समन्स बजावलंय. नाईट रायडर्स स्पोर्ट्समधल्या शेअर्सच्या विक्रीप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलंय.

रेड चिली इंटरटेनमेंट या शाहरूखच्या कंपनीनं नाईट रायडर्स स्पोर्ट्सची फ्रँचाईजी घेतलीय. 2008 मधलं हे प्रकरण आहे. जय मेहतांना
शेअर्स देण्यात आलेले शेअर्सचं मूल्य कमी ठेवण्यात आल्याचा शाहरुखवर आरोप आहे. शाहरूखला कालच ईडीच्या समोर हजर राहणं गरजेचं होतं. पण, त्यानं हजर राहण्यासाठी दुसरी तारीख मागून घेतली. शाहरुखला ईडीनं तिसर्‍यांदा समन्स बजावलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close