क्रिकेटर अमित मिश्राला बंगळुरमध्ये अटक आणि सुटका

October 27, 2015 3:51 PM0 commentsViews:

Amit Misra

27 ऑक्टोबर : एका महिलेची छेड काढून तिला मारहाण केल्याप्रकरणी टीम इंडियाचा क्रिकेटपटू अमित मिश्रा याला मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी अटक केली आणि नंतर काही वेळातच त्याची जामीनावर सुटका देखील करण्यात आली.

पीडित महिला ही अमित मिश्राची मैत्रिण असल्याचं कळतंय. गेल्यामहिन्यात क्रिकेटचा सराव करण्यासाठी अमित मिश्रा बंगळूरू इथे आला होता. त्यावेळी ही घटना घडली होती. अमित मिश्रा ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होता, त्या हॉटेलमधल्या खोलीत त्याने आपली छेड काढली, आणि बेदम मारहाण केल्याची तक्रार पीडित महिलेने बंगळूरूच्या अशोकनगर पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यानंतर आज बंगळुरू पोलिसांनी अमितची आज 3 तास चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक झाली. त्याच्या अटकेने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close