‘मराठी’वरून मंत्रिमंडळात खडाजंगी

February 3, 2010 10:38 AM0 commentsViews: 4

3 फेब्रुवारीमराठीच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना या मुद्द्यावरून धारेवर धरलं. टॅक्सी परवाना प्रकरण आणि मराठी-अमराठी वादावर मुख्यमंत्री बोटचेपी भूमिका घेत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केला. या दोन्ही प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द का फिरवला, असा जाब राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी विचारला. टॅक्सी परवाने देताना, आधी फक्त मराठी भाषा येणा-यांनाच परवाने देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका बदलली. आणि स्थानिक भाषा म्हणजेच गुजराती आणि हिंदी येणा-यांनाही प्राधान्य दिले जाईल असे म्हटले. मराठी-अमराठीच्या वादासंदर्भात सरकारने जारी केलेल्या प्रेस नोटमध्येही असाच गोंधळ झाला होता. राज्यातल्या परप्रांतीयांना संरक्षण दिले जाईल, असे आधी प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले होते. त्यानंतर लगेचच प्रेस नोट बदलत सर्वांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ, असे सांगण्यात आले. या दोन्ही घटनांचा उल्लेख करत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले.

close