गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेला सहन करतोय – चंद्रकांत पाटील

October 27, 2015 9:04 PM0 commentsViews:

27 ऑक्टोबर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेना -भाजपमध्ये चांगलाच सामना रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हेंनी केलीये, तर ही मागणी करणार्‍या नीलम गोर्‍हे कोण? असा उलट सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे. ‘गेल्या 25 वर्षांपासून आम्ही शिवसेनेला सहन करतोय, पण लवकरच आमचा स्फोट होऊ शकतो’, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Chandrakanti paril on nilam gohre

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता प्रचारसभांना वेग आला आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राडेबाजीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटवून निवडणूक कालावधीपर्यंत दुसर्‍याची नेमणूक करावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी केली आहे.

‘शिवसेनेची रोज उठसूठ भाजपवर टीका सुरू आहे. काहीही बोललं तरी चालतं असा शिवसेनेचा समज झाला आहे. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या कुरघोड्या आम्ही सहन करतोय. पण आमच्या सहनशक्तीचा सेनेने वेगळाच अर्थ काढलाय, मात्र हे फार दिवस चालणार नाही’, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा, मंत्रीमंडळाच्या विस्तारात कसं स्थान मिळवता येईल, याचा त्यांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी निलम गोर्‍हेंना दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close