मराठवाड्यातील कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत एसटीचा प्रवास

October 27, 2015 7:30 PM0 commentsViews:

swati Pitale suicide

27 ऑक्टोबर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी 1 नोव्हेंबरपासून एसटीचा प्रवास मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (मंगळवारी) केली. लातूरमधील स्वाती पिटले या तरुणीने बसच्या पाससाठी 260 रुपये नाहीत म्हणून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाती अभय योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 4 लाख 60 हजार या योजनेचा लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर 2015 ते मार्च 2016 या काळात ही योजना राबवणयात येणार आहे. या योजनेतंर्गत एसटी, कॉलेज विद्यार्थ्यांच्या पासचा खर्च उचलणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 9 कोटी रूपये देण्यात येणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close