डोंबिवलीत खंडणीसाठी मुलाची हत्या

February 3, 2010 11:00 AM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारीडोंबिवलीत एका 12 वर्षांच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. तुषार सोनी असं या मुलाचं नाव आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता शाळेत जात असताना तुषारचं अपहरण झाले होते. पण खंडणीची रक्कम मिळण्यापूर्वीच अपहरणकर्त्याने तुषारची हत्या केली. राकेश लखारा असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मूळच्या राजस्थानच्या राकेशचे 16 फेब्रुवारीला लग्न आहे. लग्नानंतरचे जीवन सुखी व्हावे, यासाठी त्याने पैसे कमावण्याचा शॉर्टकट शोधला. राकेशनं ज्वेलर्सचे व्यावसायिक किरण सोनी यांचा मुलगा तुषारचं त्याने अपहरण केले. आणि 5 लाखांची खंडणी मागितली. पण खंडणीची रक्कम मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने तुषारची हत्या केली. आणि नंतर गावी पळून जायचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले.डोंबिवलीत 6 महिन्यांपूर्वी खंडणीसाठी अशाच एका मुलाचं अपहरण झाले होते. पण त्या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नाही.

close