सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचा अंतरिम जामीन फेटाळला

October 27, 2015 8:06 PM0 commentsViews:

suraj parmar

27 ऑक्टोबर : सुरज परमार आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ चार नगरसेवकांचा अंतरिम जामीनासाठीचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या चार नगरसेवक आणि पालिका अधिकार्‍यांची नावं लिहिली होती, त्याच्या विरोधात पोलिसांनी आरोपपत्र तयार करण्याला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर या चारही नगरसेवकांनी अंतरिम जामीनासाठी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र कोर्टानं हा अर्ज फेटाळला आहे.

ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्यानंतर ठाणे पोलिसांना घोडबंदर रोडवरील परमार यांच्या गाडीतून एक सुसाईड नोट सापडली होती. नेत्यांना लाच न दिल्यामुळे आत्महत्या करावी लागतेय असं परमार यांनी त्या नोटमध्ये म्हटलंय. त्यामुळे त्यांनी नेमकी कोणत्या नेत्यांची नावं खोडली आणि ते नेते कोण होते असा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. त्यानंतर फॉरेन्सिक अहवालामध्ये राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसे निलंबित नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची नावं उघड झाली होती. ही नावं उघड झाल्याने ठाण्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close