देशातली परिस्थिती अणुबॉम्बसारखी,शास्त्रज्ञांनीही व्यक्त केली चिंता

October 28, 2015 8:52 AM0 commentsViews:

scnt_28 ऑक्टोबर : वाढत्या असहिष्णुतेविरोधात देशभरातल्या लेखकांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन उभारलंय. आता शास्त्रज्ञांनीही त्याला पाठिंबा दिलाय. देशातली सध्याच्या परिस्थितीचा कधीही स्फोट होऊ शकेल अशा अणुबॉम्बसारखी परिस्थिती असल्याची गंभीर चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय.

जवळपास 135 शास्त्रज्ञांनी एक वेब याचिका तयार केलीय. ही याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवण्यात येणार आहे. यावर देशभरातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटी आणि जेएनयूच्या प्राध्यापकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहे.

देशभरात असहिष्णुतेच्या वातावरणा विरोधात लेखक आणि साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले आहे. या सर्व साहित्यिकांनी दादरी प्रकरण, डॉ. कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हे पाऊल उचललंय. आता त्याला शास्त्रज्ञांनीही साथ दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close