मराठवाड्यात पाण्यासाठी पायपीट

February 3, 2010 11:27 AM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारीनेहमीच दुष्काळाच्या छायेखाली असणा-या मराठवाड्याला आतापासूनच तीव्र पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांनी आणि विहिरींनी आत्ताच तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी गावक-यांना अनेक मैल पायपीट करावी लागत आहे. यंदा पावसाने दीड महिना दडी मारल्याने धरण आणि तलाव भरलेच नाहीत. धरणांमध्ये सरासरी 16 टक्के पाणीसाठा उरल्याने आगामी काही दिवसात मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. औरंगाबाद विभागात सध्या 3 हजार 474 गावांना ही टंचाईची झळ पोहचली आहे.प्रत्येक जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या खालीलप्रमाणे- नांदेड- 1 हजार 573 परभणी- 142 हिंगोली- 257 बीड- 320 उस्मानाबाद- 355 लातूर- 827

close