लादेन आमचा हिरो, आम्हीच अतिरेकी तयार केले -परवेझ मुशर्रफ

October 28, 2015 10:30 AM0 commentsViews:

pervez_on_laden28 ऑक्टोबर :  ओसामा बिन लादेन, अयमान अल जवाहिरी आणि हक्कानी बंधू पाकिस्तानचे हिरो आहेत, अशी जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दिलीय. पाकिस्तानातल्या एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

अफगाणिस्तानमधल्या सोव्हियत सैन्याशी आणि काश्मीरमध्ये लढण्यासाठी धार्मिक आधारावर अतिरेकी तयार केले. आमच्यासाठी ते स्वातंत्रयोध्दे होते. आता परिस्थिती बदललीय. हे सर्व अतिरेकी आता आमच्यावरच उलटलेत, अशी हतबलताही मुशर्रफ यांनी व्यक्त केली. तसंच हाफीज सईद, आरएसएस आणि शिवसेना हे एकच आहे. शिवसेना आणि आरएसएस भारतात काय करते असा सवाल करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना हाफीज सईदशी केली.

माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्या हत्या प्रकरणी मी स्वत: त्यांना तुमच्या जीवाला धोका असल्याची माहिती देण्यासाठी फोन केला होता. बेनजीर भुट्टो यांच्यावर बेतुल्ला मेहसूद यानेच हत्या घडवून आणली असंही ते म्हणाले. पाकिस्तानात अतिरेक्यांना प्रशिक्षण मिळतं, असा भारताचा दावा आहे. मुशर्रफ यांच्या कबुलीमुळे या दाव्याला बळ मिळालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close