बिहार निवडणुकीत तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान सुरू

October 28, 2015 12:03 PM0 commentsViews:

Vote_645__162135847728 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. आज सकाळी 9 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान झालंय. 50 जागांसाठी होणार्‍या या मतदानात लालू प्रसाद यादव यांच्या तेजप्रताप आणि तेजस्वी यादव या मुलांचेही भवितव्य ठरणार आहे.

सारन हा लालूंचा बालेकिल्ला असलेला भाग आजच्या टप्प्यात आहे. लालू प्रसाद यादव आणि भाजप नेते सुशील मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

तसंच नितीशकुमार यांचं प्राबल्य असलेल्या नालंदा जिल्ह्यातील सात जागांवरही आज मतदान होतंय. तिसर्‍या टप्प्यात पाटणा, वैशाली, सारण, नालंदा, बक्सर आणि भोजपूर या जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात 808 उमेदवार रिंगणात आहेत.तर 71 महिला आज आपलं भाग्य आजमावत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close