‘स्पेशल 26′ स्टाईल भोवली, 2 भामटे जेरबंद

October 28, 2015 1:44 PM0 commentsViews:

nagar cbi fake28 ऑक्टोबर : अहमदनगर शहर पोलिसांनी दोन तोतया सीबीआय अधिकार्‍यांना जेरबंद केलंय. आदित्य गुजर आणि सागर जाधव अशी या भामट्यांची नावं आहेत. हे दोन्ही तोतयांकडून पोलिसांनी सीबीआईचे बनावट ओळखपत्र, एक एअर पिस्टलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोलमोहर रोड परिसरात हे दोन्ही चोर व्यापार्‍यांना ‘स्पेशल 26′ या फिल्मी स्टाईलने लुटण्याच्या बेतात होते. पण पोलिसांना याचा सुुगावा लागताच त्यांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केलं. या दोन्ही तोतयांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close