‘ओबीसी नेत्यांच्या मुलांना आरक्षण नको’

October 28, 2015 2:57 PM0 commentsViews:

obc_resr28 ऑक्टोबर : ओबीसी नेत्यांच्या मुलांना आरक्षण नको, अशी शिफारस राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने केली आहे. केंद्र आणि राज्यातले ओबीसी मंत्री, खासदार, सचिव तसंच वर्ग एकच्या अधिकार्‍यांच्या मुलांना आरक्षणाचे फायदे देऊ नयेत, अशी आयोगाची शिफारस आहे.

आमदारांच्या मुलांचा मात्र या शिफारशीत समावेश नाही. खासदारांपेक्षा आमदारांना वेतन आणि भत्ते कमी असतात, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज असल्याचं आयोगाचं मत आहे. पण हे आमदार मंत्री झाले तर मात्र त्यांना आरक्षणातून वगळावं, अशी आयोगाची
शिफारस आहे. तसंच ओबीसी आरक्षणासाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात यावी, असंही आयोगानं सुचवलंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवा तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये 27 टक्के आरक्षण आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close