बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर कारवाई का नाही?

February 3, 2010 12:57 PM0 commentsViews: 2

3 फेब्रुवारीमुंबईतल्या इंटर कॉन्टिनेन्टल हॉटेलवर शिवसेनेनं केलेल्या हल्ल्याप्रकरणीहायकोर्टानं सरकारला फटकारले आहे. सरकारने फक्त खासदार संजय राऊत यांच्यावरच गुन्हा का दाखल केलाय? उद्धव ठाकरे आणिबाळासाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल का केलेला नाही? असा सवाल कोर्टाने सरकारला विचारला आहे.राजकीय पक्षांनी केलेल्या हल्लांमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित पक्षांकडूनच घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी कोर्टाकडे केला होता. इंटर कॉन्टिनेन्टल आणि मुंबई विद्यापीठावर झालेल्या हल्ल्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होती. त्यावेळी कोर्टाने इंटर कॉन्टिनेन्टल हॉटेलवर हल्ल्याप्रकरणी केवळ राऊतांवरच का? पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर का कारवाई केली नाही? असा सवाल सरकारला विचारला. राज्य सरकारला आता याबाबत हायकोर्टाला उत्तर द्यावे लागणार आहे. दरम्यान, हॉटेलचं झालेलं सगळं नुकसान वसूल केल्याचा दावा सरकारनं केलाय.'हॉटेल सहारा इंटरनॅशनल'च्या 31 मराठी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. या मुद्दयावरूनच शिवसेनेने सहारा, इंटर कॉन्टिनेन्टल आणि हॉटेल ललित या हॉटेल्सवर हल्ला करून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. हल्ला करणा-या दीडशे शिवसैनिकांवर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close