‘FTII’च्या विद्यार्थ्यांचा संप अखेर मागे, आंदोलन सुरूच

October 28, 2015 7:12 PM0 commentsViews:

FTII strike off

28 ऑक्टोबर :  गेल्या 139 दिवसांपासून सुरू असलेला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा बेमूदत संप आज अखेर मागे घेण्यात आला. मात्र, आंदोलन यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने गजेंद्र चौहाण यांच्या निवडीला आमचा विरोध सुरूच ठेवणार, असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहाण यांची निवड करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निर्णायाचा विरोध करत बेमूदत संप पुकारला होता. चौहाण यांची पदावरून हकालपट्टी होईपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला होता. दरम्यान, 139व्या दिवशी संप मागे घेत असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आज जाहीर केलं. वर्ग पुन्हा सुरू होतील मात्र, चौहाण यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी होईपर्यंत शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close