ठाण्यात 12 हजार टन डाळी आणि कडधान्य जप्त

October 28, 2015 4:39 PM0 commentsViews:

Dhanya satha

28 ऑक्टोबर : ठाण्यातील डायघर भागात तब्बल 120 कोटींची 12 हजार टन डाळ जप्त केली आहे. पोलीस आणि पुरवठा विभागाने छापे टाकून ही कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातली आतापर्यंतची ही तिसरी मोठी करवाई आहे.

गेल्या काही दिवसांपासून डाळीच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. डाळींचे वाढलेले दर लक्षात घेत साठेबाजांवर कडक कारवाईची मोहिम राज्यसरकारने सुरू केली आहे. त्यानंतर ठिकठिकाणी साठवून ठेवलेला डाळींचा आणि कडधान्यांचा साठा जप्त केला जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close