दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याला सुप्रीम कोर्टाचा नकार

October 28, 2015 4:45 PM0 commentsViews:

Supreme court on crackarees

28 ऑक्टोबर : दिवाळीच्या काळात संपूर्ण देशात फटाक्यांच्या वापरावर सरसकट बंदी घालण्याला सुप्रीम कोर्टाने आज (बुधवारी) नकार दिला. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती न केल्याबद्दल कोर्टाने केंद्र सरकारबद्दल नाराजीही व्यक्त केली.

फटाक्यांच्या वापरावर थेटपणे बंदी घालता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. त्याचवेळी फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या माध्यमातून तातडीने जनजागृती सुरू करावी. फटाक्यांचे लोकांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल त्यात माहिती देण्यात यावी, असे निर्देश कोर्टाने केंद्र सरकार आणि संबंधित संस्थांना दिले. येत्या 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या काळात याबाबत जागृती करण्यात यावी, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

रात्री 10 ते सकाळी 6 या काळात फटाक्यांच्या वापरावर असलेले निर्बंध कायम असतील, असेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. याबाबतही लोकांना माहिती देण्यात यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close