या हो या…हुरडा खा!

February 3, 2010 2:25 PM0 commentsViews: 87

3 फेब्रुवारीगच्च हिरव्या रानात…कणसांनी लगडलेल्या, ज्वारीच्या भरल्या रानात… भलरीचे सूर घुमतायत…या रानगीतांच्या तालावर गोंडेदार कणसं तोडली जातायत…आणि बांधावरच्या झाडाखाली कोवळा लुसलुशीत, गरमागरम हुरडा खाण्यात मंडळी दंग आहेत…सोलापूर, मंगळवेढा परिसरात तुम्ही आता जाल तर हेच दृश्य पाहायला मिळेल. कारण सध्या हुरड्याचा 'सिझन' आहे!इथल्या प्रसिद्ध मालदांडी कोवळ्या, दुधाळ ज्वारीच्या कणसांचा हुरडा एकदा का खाल्ला की माणूस खुळावलाच समजा…शेताच्या बांधावर गोव-या, लाकडांच्या निखा-यावर ज्वारी किंवा गव्हाची कणसं आणि हरभरा खरपूस भाजला जातो. हातावर चोळून कणसांचे दाणे काढले जातात. या हुळहुळणा-या हुरड्यासोबत तोंडी लावायला शेंगांची चटणी, भरलेली वांगी, आणि ओलं कोवळं खोबरं..!..आहा!! एवढंच नाही बरं का…जोडीला अस्सल घट्ट दह्याचा मठ्ठा, त्याच्यासोबत भुईमुगाच्या शेंगा, पोळीवर गावरान तूप…ताज्या हरभ-याचे डहाळे आणि साखरगोड ऊस…हुर्डा पार्टी!!!…गप्पांचा फड रंगवायला..गावाकडच्या आठवणी जागवायला..मातीशी नातं जोडायला…एखाद्या गावी जायलाच हवं..हुर्डा खायला…

close