पायरसीच्या विरोधात उपोषण

February 3, 2010 2:59 PM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारीलागोपाठ एकापेक्षा एक चांगले मराठी सिनेमे रिलीज होत असताना, त्याच्या पायरटेड सीडीजही बाजारात यायला लागल्या आहेत.या पायरसीच्या विरोधात आज मराठी इंडस्ट्री एकत्र आली. भारतमाता थिएटरजवळ मराठी कलाकारांनी साखळी उपोषण केले. अवधूत गुप्ते आणि मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजीव पाटील, उपेंद्र लिमये, श्रीरंग गोडबोले असे मराठीतले दिग्गज कलाकार उपस्थित होते. आपलं आंदोलन सरकार विरोधात नसून प्रेक्षकांना पायरटेड सीडी घेऊ नका, असं आवाहन करण्यासाठी असल्याचं या कलाकारांनी सांगितले. प्रेक्षकांनी जर 30 रुपयांची पायरेटेड सीडी घेतली तर निर्मात्याला आत्महत्या करायची वेळ येईल, असं अवधूत गुप्ते म्हणाले. तर पायरेटड सीडी विक्रीला प्रेक्षकांनीही विरोध करावा, असे आवाहन राजीव पाटील यांनी केले.

close