डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील दोन्हीही संशयित सनातनचे साधक

October 29, 2015 9:31 AM0 commentsViews:

 dabholkar new29 ऑक्टोबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोन संशयितांची नावं सीबीआयनं हायकोर्टात बंद लिफाफ्यात सादर केली आहे. पण हे दोन संशयित सनातनचे साधक असल्याची माहिती सीबीआयनं कोर्टात दिल्याचं समजतंय. पण गोवा बॉम्बस्फोटातला फरार आरोपी आणि सनातनचा कार्यकर्ता रुद्रगौडा पाटील याचा हत्येतला सहभाग पुढे आला नसल्याचं सीबीआयनं सांगितलं.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी सीबीआय तसंच एसआयटीकडून केल्या जाणार्‍या तपासावर देखरेख ठेवण्याची मागणी केलीय. त्यांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणार्‍या सीबीआयनं तर पानसरे यांच्या हत्येचा तपास करणार्‍या एसआयटीनं तपासाचा अहवाल कोर्टात सादर केला.

दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने दोन संशयितांची नावं कोर्टापुढे सादर केली. ही दोन्ही संशयित सनातनचे साधक आहे अशी माहिती आता पुढे आलीये. पण, दुसरीकडे गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रुद्रगौडा पाटील याचा सहभाग सीबीआयने नाकारलाय. दाभोलकर हत्येप्रकरणी सुरुवातीपासून सनातनवर संशय व्यक्त केला जात होता.

अखेरीस सीबीआयने त्यावर एकाप्रकार शिक्कामोर्तब केलंय. विशेष म्हणजे पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला ताब्यात घेण्यात आलंय. पानसरे हत्याप्रकरणात आपण सहभागी असल्याचंही त्यांनं कबूल केलंय. दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनवर संशय आता खरा ठरतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close