इथं बरं वाटत नाही, भारतात परतायचं आहे, राजनची धडपड सुरू

October 29, 2015 1:20 PM0 commentsViews:

rajan_bali_jail29 ऑक्टोबर : अटकेत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजनची जेलमधून दमबाजी सुरूच आहे. आपण पोलिसांना शरण आलेलो नाही, असं छोटा राजनने म्हटलंय. राजनला सध्या इंडोनेशियातल्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तिथे आपल्याला बरं वाटत नाही. आपल्याला भारतात परतायचं आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

राजन झिम्बाब्वेला पळून जाणार होता, असं सांगितलं जात होतं. पण झिम्बाब्वेला जायचं नव्हतं, असंही त्याने स्पष्ट केलंय. दरम्यान, सीबीआयची टीम या आठवड्यात बालीला जाणार आहे. त्यासाठीची कागदपत्रं सीबीआयनं जमवली आहेत. दरम्यान, बालीमध्ये राजनला ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलंय तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close