मुल्हेरचा रासक्रीडा उत्सव

October 29, 2015 2:03 PM0 commentsViews:

29 ऑक्टोबर : सातशे वर्षांपासून सुरू असलेला मुल्हेरचा रासक्रीडा उत्सव उत्साहात पार पडला. बागलाण तालुक्यातल्या मुल्हेरच्या उद्धव महाराज समाधी मंदिरात हा उत्सव पार पडला.

केळीच्या पानं आणि झेंडूंच्या फुलांनी सजविलेले पंचवीस फूट व्यासाचे हे मोठे चक्र सूर्य, चंद्राच्या साक्षीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत रास स्तंभावर चढवण्यात आले. हे चक्र म्हणजे मंडळ मानलं जातं. गोपी -कृष्णाच्या निस्मीम प्रेमाचं प्रतिक म्हणून या रासक्रीडा उत्सवाकडे पाहिलं जाते.

महाभारत काळातील मयुरनगरीचा म्हणजेच मुल्हेरचा राजा मयूरध्वज याने इ.स. पूर्व 3000 मध्ये हा उत्सव सुरू केला. तर उपलब्ध पुराव्याच्या आधारे उद्धव महाराजांचे गुरू काशिराज महाराज यांनी 1640 पासून या उत्सवास व्यापक स्वरूप दिले.अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसारचं हा रासक्रीडा उत्सव साजरा केला जातोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close