बारावीच्या मुलीची वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या

October 29, 2015 3:51 PM1 commentViews:

Öê×êÖêË×ËÖêê×y

29 ऑक्टोबर : कॉलेजच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. तेजस्विनी असं आत्महत्या केलेल्या विद्याथच्नीचं नाव आहे. तेजस्वीनी मूळची औरंगाबादची होती. तेजस्विनी ही नेवासा फाटाजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये शिकत होती.

या कॉलेजच्या वर्गातच तेजस्विनीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. तेजस्विनीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, तेजस्विनीने कॉलेजच्या वर्गात आत्महत्या कशी काय केली? वर्गात तेजस्विनी एकटीच कशी काय होती? त्यामुळे तेजस्विनीच्या आत्महत्येबाबत तिच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. तसंच तेजस्विनीने ज्या वर्गात आत्महत्या केली, त्याची उंची खूप आहे. त्यामुळे तिचा हात तिथवर कसा पोहोचला, असा सवालही उपस्थित होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Gautam More

    So sad……

close