शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंची तहसिलदारांना शिवीगाळ

October 29, 2015 5:48 PM0 commentsViews:

29 ऑक्टोबर : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या प्रकरणातून तहसीलदाराला शिवीगाळ केली आहे. दातओठ खात ते तहसीलदार रमेश मुनलोड यांच्यावर तर ते तुटून पडलेच पण त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दमदाटीही केली. यावेळी खैरेंचा एवढा तोल गेला की आसपास माणसं आहेत, मोबाईल शूट सुरू आहे याचंही त्यांना भान नव्हतं.

Chandrakant on tahasilfatr

औरंगाबादेत वाळूंज परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. याला खासदार खैरेंचा विरोध आहे. हे राज्य मोदींचं आहे, मोगलांचं नव्हे, असं खैरेंनी तहसिलदारांना दर्डावून सांगितलं. इतकीच नाही तर महिला जिल्हाधिकारी निधी पांडे यांना अश्लील शिवीगाळ करत करत त्या औरंगजेबची औलाद असल्याचंही खैरेंनी म्हटलं आहे.

आपल्या देशात सरकारी अधिकार्‍यांची काय अवस्था होत असेल याचं हे ताजं उदाहरण. हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना हिंदूचे शत्रू ठरवूनही ते मोकळे झाले. राजकीय पुढार्‍यांची दमदाटी सहन करतच आणि त्यांची मर्जी सांभाळतचं अधिाकर्‍यांना काम करावं लागतं, हेच या प्रकरणावरुन ढळढळीतपणे समोर आलंय. सरकारी नोकरांना स्वत:चे नोकर समजून त्यांच्याशी वागण्याची ही कुठली पध्दत आहे? चंद्रकांत खैरे यांच्या या वर्तणुकीचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close