बॉलिवूडने सोडले शाहरुखला वा-यावर

February 3, 2010 5:04 PM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारीसध्या विषय गाजतोय तो शाहरुख खानचा. खरं तर हल्ली सिनेमांवर राजकीय पक्षांनी, संघटनांनी बहिष्कार टाकणं कॉमन झालंय. बॉलिवूडलाही त्याची सवय लागलीय. पण शिवसेनेनं शाहरुखच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मात्र तो एकटा पडलेला दिसतोय. आमीर खानच्या 'फनाह'च्या वेळी भाजपनं गुजरातमध्ये बहिष्कार टाकला होता. तेव्हा आमीर खानला एकट्यानं लढा दिला. राहुल ढोलकियाच्या 'परझानिया', नंदिता दासच्या 'फिराक'च्या वेळीही असाच अनुभव आला होता. 'वेक अप सिद'मध्ये 'बॉम्बे' शब्द वापरल्यानं करण जोहरला मनसेचे अध्यक्ष नेते राज ठाकरेंची भेट घ्यावी लागली होती.पाकिस्तानी खेळाडूंबद्दल बोलल्याच्या प्रकरणावरून शाहरुख खाननं शिवसेनेची माफी मागायला नकार दिला. पण यावरून फिल्म इंडस्ट्री शाहरुखच्या बाजूनं उभी राहिलेली दिसलेली नाही. अमिताभ बच्चनच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये तर त्यानं बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक केलंय. आणि शाहरुखच्या प्रश्नाकडं कानाडोळा केलाय. आणि एरवी सतत बोलणारे स्टार्स आता मात्र गप्प बसलेत. नाही म्हणायला कोंकणा सेन, रणवीर शौरी, प्रीती झिंटा, अनुपम खेर आणि रितेश देशमुख यांनी सोशल नेटवर्किंगमधून किंग खानला पाठिंबा दिलाय. बिच्चा-या किंग खानला तेवढाच आधार!

close