गॅरी कर्स्टन यांना मुदतवाढ

February 3, 2010 5:22 PM0 commentsViews: 8

3 फेब्रुवारीभारतीय टीमचे कोच गॅरी कर्स्टन यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. कर्स्टन यांचा सध्याचा करार पुढच्या महिन्यात संपतोय. आणि त्यानंतर ते मायदेशी परतणार असल्याची बातमी पसरली होती. दक्षिण आफ्रिकन टीमचे कोच म्हणून त्यांची नियुक्ती होणार अशीही बातमी होती. पण आता स्वत: कर्स्टन यांनीच या बातमीचा इन्कार केलाय. आणि आफ्रिकन बोर्डाने आपल्याशी संपर्क साधला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर काल स्वत: बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी कर्स्टन यांना मुदत वाढ देणार असल्याचं सांगितलंय. कर्स्टन भारतीय टीमचे कोच झाल्यानंतर टीमने टेस्टमध्ये आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलंय. तर सात पैकी सहा वन डे सीरिज जिंकल्यात.

close