आता चीनमध्येही हम दो, हमारे दो…!

October 29, 2015 8:31 PM0 commentsViews:

china-baby-policy

29 ऑक्टोबर : गेल्या अनेक वर्षांपासून चीनमध्ये एकापेक्षा जास्त अपत्याला जन्म देण्यावर असलेले निर्बंध अखेर आज (गुरुवारी) रद्द करण्यात आले आहेत. आता चीनमध्ये एका दाम्पत्याला दोन अपत्यांना जन्म देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

चीनमधील अधिकृत वृत्तसंस्था झिनुआने केलेल्या ट्विटनुसार, लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गेल्या तीन दशकांपासून ‘एक जोडपं – एकच अपत्य’ असं धोरण राबवणार्‍या चीननं हा कायदा बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढच्या पाच वर्षांत चीनची अर्थव्यवस्था कुठल्या गतीने, दिशेने जाईल, याबाबत सत्ताधारी कम्युनिस्ट पाटच्च्या चार दिवसांच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं. या वाटचालीचा भाग म्हणूनच, कुटुंबनियोजनाची नीती बदलून, ‘हम दो हमारे दो’ धोरण स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

चीनमधील अनेक उजव्या विचारसरणीच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या धोरणावर टीका केली होती. या धोरणामुळे अनेक दाम्पत्यांना गर्भपातालाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला. त्याचं चीनमध्ये सर्वच स्तरांतून स्वागत होतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close