उत्तर प्रदेशात मंत्रीमंडळातील आठ मंत्र्यांची हकालपट्टी

October 29, 2015 4:42 PM0 commentsViews:

Image akhilesh_yadava23_300x255.jpg29 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज (गुरुवारी) मंत्रिमंडळाबाबत मोठा आणि तेवढाच धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी आठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर, नऊ मंत्र्यांची खाती काढून घेतली. ही सर्व खाती मुख्यमंत्री यादव यांनी स्वतःकडे घेतली आहेत. या मोठ्या फेरबदलाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे शिफारसपत्र राज्यपालांना पाठवले असून 31 ऑक्टोबर रोजी कॅबिनेटमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत.  या फेरबदलांमुळे राज्यात उलटसुलट अफवांचे पेव फुटले आहे. बिहार निवडणुकीत एनडीएला सत्ता मिळण्याची शक्यता असल्याने हे फेरबदल केले असल्याचेही काहींनी सांगितले आहे. राज्याचा कारभार सुधारावा यासाठी त्यांनी काही खाती आपल्याकडे घेतली असल्याचं सांगितलं जात आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close