कोल्हापूर-कडोंमपाच्या प्रचारतोफा आज थंडावणार

October 30, 2015 10:20 AM0 commentsViews:

kdmc and kolhapur_election

30 ऑक्टोबर : कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (शुक्रवारी) संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर मात्र उमेदवार अथवा राजकीय पक्षांना जाहीर सभा, पदयात्रा, मेळावे घेता येणार नसल्याने पडद्यामागून प्रचाराची सूत्रे हलतील.

कल्याणमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कल्याणमध्ये सभा होणार आहेत. प्रचाराची अंतिम वेळ सहापर्यंत असल्याने दोघांच्याही सभा दुपारी 2 वाजता होणार आहेत. दोघांच्या सभां वेगवेगळ्या वेळी होणार असल्यातरी हे दोघे नेते शेवटच्या दिवशी एकमेकांविषयी काय बोलताता याकडेच सगळ्यांच लक्ष लागलं आहे. या निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजपच्या अनेक नेत्यांनी एकमेकांवर थेट टीका केल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. तर कोल्हापूरातही प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्ष मोठं शक्ती प्रदर्शन प्रचार करणार आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 1 नोव्हेंबरला मतदान आहे आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close