बेस्ट कर्मचार्‍यांची दिवाळी आनंदात, 5 हजार बोनस जाहीर

October 30, 2015 5:47 PM0 commentsViews:

Image img_221722_best63_240x180.jpg30 ऑक्टोबर : बेस्ट कर्मचार्‍यांना अखेर दिवाळी बोनस म्हणून 5 हजार जाहीर झाला आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त बोनस नाकारण्यात येत होता. या विरोधात बेस्ट कामगारांच्या संघटनांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

यापार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बेस्ट कर्मचार्‍यांना पाच हजार रुपयांचा बोनस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा दुधवडकर यांनी केली आहे. मात्र, बेस्ट आथिर्कदृष्टया तोट्यात असताना बोनससाठी पैसे कूठून आणणार? याचं उत्तर नंतर देईन, असंही दुधवडकर यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close