…तर वेळ पडल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेऊन- उद्धव ठाकरे

October 30, 2015 9:24 PM0 commentsViews:

uddhav-and-devendra 121

30 ऑक्टोबर : हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर वेळ पडल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेऊन, सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) डोंबिवलीमधल्या सभेत दिला. दरम्यान, याच सभेत सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा तात्काळ फेटाळला. राज्य सरकारमध्ये काम करताना आपली कुचंबणा होतेय, असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावरून नंतर उद्धव यांनी आपल्या भाषणात भाजपचा खरपूस समाचार घेतला.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला आजपर्यंत जे काही मिळालं, ते केवळ नशिबाने मिळालेले नसून अनेक लोकांच्या आशीर्वादाने मिळालं. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपला पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळेच त्यांच्यांकडून अशी वागणूक दिली जातं आहे. पण शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला भाजपने मंत्री केलेले नाही. शिवसेनेने त्यांना मंत्री केलं आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा देण्याची घाई करू नका. शिवसेनेला जर नीट वागणूक मिळाली नाही तर वेळ पडल्यास सरकारचाच पाठिंबा काढून घेऊन त्यांना रस्त्यावर आणू, असं कडक भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. भाजपने आम्हाला अक्कल शिकवण्यापेक्षा दिवाळीच्या आत डाळींचे भाव खाली आणणार की नाही हे सांगावं, असाही टोला उद्धवा ठाकरे यांनी लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close