ठाण्यात पाईपलाईन फुटली

February 4, 2010 9:18 AM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीठाण्याच्या नितीन कंपनी परिसरात सकाळीच महापालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन फुटली. त्यामुळे परिसर जलमय झाला. जवळच्या सूर्यदर्शन इमारतीत पाणी शिरले. रस्त्यावरची वाहने पाण्याखाली गेली. रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने ही पाईपलाईन फुटली. त्यामुळे वागळे इस्टेट, समता नगर, रामचंद्र नगर, लुईसवाडी या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

close