इंधन किंमत वाढीची शिफारस

February 4, 2010 9:28 AM0 commentsViews: 7

4 फेब्रुवारीपेट्रोल, डिझेलच्या किंमतींविषयी अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या किरीट पारीख पॅनेलने इंधनांच्या किंमतींवरील नियंत्रण हटवण्याची सूचना केली आहे. हे नियंत्रण हटवल्यास पेट्रोलच्या किंमती 4.72 रुपयांनी तर डिझेलच्या किंमती 2.33 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी आणि केरोसिनही 6 रुपयांनी महाग करण्याची सूचना या कमिटीने केलीय.सध्या इंधनांच्या किंमती सरकारकडून नियंत्रित केल्या जातात. यामुळे मोठ्या तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. पण सरकार मात्र पारीख पॅनलच्या सूचना सध्या तरी अमलात आणण्याची शक्यता नाही. महागाई रोखण्यात सरकारला अपयश आले आहे, अशी जोरदार टीका सध्या सरकारवर होत आहे. अशा परिस्थितीत सरकार इंधनाच्या किंमती अशा प्रकारे वाढवण्याची शक्यता कमी आहे.

close