कर्नाटक सरकारची दांडगाई सुरूच

February 4, 2010 9:45 AM0 commentsViews: 6

4 फेब्रुवारीमहाराष्ट्रात सध्या मराठीच्या अस्मितेवरून राजकीय वाद सुरू आहे. तर बेळगावात उद्या होणा-या सीमाबांधवांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने अजून परवानगी दिलेली नाही.महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करून हा मेळावा कोणत्याही परिस्थितीत घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बेळगावात पुन्हा एकदा कर्नाटक सरकार आणि मराठी सीमा बांधव यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठीच्या अस्मितेची मालकी सांगणा-या राज ठाकरे यांनी सीमावासियांच्या मदतीला धावून यावे असे आवाहन एकीकरण समितीने केले आहे. या मेळाव्यात जवळपास 50 हजार सीमाबांधव सहभागी होतील, असे संयोजकांनी सांगितले.

close