दुष्काळाचा फटका संत्र्यांना

February 4, 2010 10:02 AM0 commentsViews: 51

4 फेब्रुवारीराज्यातल्या टंचाईसदृश्य परिस्थितीचा सर्वात जास्त फटका विदर्भाला बसला आहे. पाणीटंचाईमुळे नागपुरातील संत्रा पीक संकटात सापडले आहे. संत्र्याच्या बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने हताश झालेले शेतकरी संत्र्याची बागच तोडताना दिसत आहेत.वर्षाला दोन हंगामात संत्र्याचं उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात 12 हजार हेक्टर जमिनीवर संत्र्याच्या बागा आहेत. पण या वर्षी पाण्याच्या अभावामुळे संत्र्यावर संक्रांत आली आहे.संत्रा बागांचे नुकसान झाल्यानंतर सरकारने प्रति झाड 125 रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत अजून शेतक-यांपर्यंत पोहोचलेलीच नाही.नागपूर जिल्ह्यात 1 हजार 103 गावे सरकारच्या टंचाईग्रस्तांच्या यादीत आहेत. यापैकी ब-याच भागातला शेतकरी संत्रा उत्पादक आहे. संत्रा जगवण्यासाठी सरकारला पाण्याची पर्यायी योजना करणे गरजेचे आहे. तरच'नागपूर म्हणजे संत्रा' ही नागपूरची ओळख कायम राहील.

close