शिवसेनेवर योग्य वेळी कारवाई करू- अशोक चव्हाण

February 4, 2010 10:19 AM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीशिवसेना जे काही बोलतेय त्याकडे आमचे लक्ष आहे. योग्य वेळ आली की आम्ही कारवाई करू, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत.सध्या शिवसेना आणि शाहरुख खान यांच्यातला वाद चिघळत चालला आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा शाहरुखला धमकी दिली आहे. तर शाहरुखने माफी मागायला पुन्हा ठाम नकार दिला आहे. शाहरुखची ही भूमिका कायम असेल तर त्याला देशात राहण्याचाच अधिकार नाही, असे राऊत यांचे म्हणणे आहे. शाहरुखने पहिल्यांदा मुंबईत यावे, मग बघू घेऊ.. अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे. दुसरीकडे टॅक्सी परवान्यांबाबतचा निर्णय हा कायद्याला अनुसरूनच घेण्यात आला. तो फिरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा त्यांनी केला. महसूल मंत्री नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांची बाजू यावेळी उचलून धरली. टॅक्सी परवान्यांसाठी मराठी सक्तीचा निर्णय का फिरवला, असा जाब राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काल विचारला होता.

close