घाटकोपरमध्ये टेक्सटाईल कंपनीला लागलेली आग आटोक्यात

October 31, 2015 12:16 PM0 commentsViews:

ghatkopar fire31 ऑक्टोबर : मुंबईतील घाटकोपर युनिव्हर्सल टेक्सटाईल या कंपनीला सकाळी सहा वाजेच्या सुमारास आग लागली. गोदामातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आहे.

या आगीत अग्निशमन दलाचे कर्मचारी भागवत निकम किरकोळ जखमी झालाय. या गोदामात मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आग आटोक्यात आणायला उशीर लागला. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग कशी लागली हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close