शिवसैनिकांची दादागिरी, आरटीआय कार्यकर्त्याला बेदम मारहाण

October 31, 2015 1:20 PM1 commentViews:

latur_sena_331 ऑक्टोबर : माहिती अधिकारातून माहिती मागवल्यामुळे कारवाई झाली याचा राग धरून शिवसैनिकांनी एका आरटीआय कार्यकर्त्यांला बेदम मारहाण केल्याची घटना लातूरमध्ये घडली. शिवसैनिकांनी भर शाळेत रॉड, सळईने मलीकार्जून भाईकट्टी यांना काळ फासून बेदम मारहाण केली. या प्रकरणी शिवसेनेचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या चार शिवसैनिकांची हकालपट्टी केलीय.

लातूरच्या शाहू महविद्यालयाच्या बांधकामात अनियमितता केल्याप्रकरणी मनपाने नोटीस काढली होती. हे प्रकरण माहिती अधिकार कार्यकर्ता मलीकार्जुन भाईकट्टी यांनी बाहेर काढले होते. मनपा कारवाईस विलंब करत असल्याचा त्याचा आरोप होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मलीकार्जून भाईकट्टी यांना मारहाण केली. आज अचानकपणे रॉड , सळईने मारहाण करत या कार्यकर्त्यांनी भाईकट्टी यांच्यावर हल्ला केला. शिवसेनेचे अभय साळुखे आणि इतर कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता. अभय साळुखे हे यापूर्वी मनसेचे जिल्हा प्रमुख होते. लातूरच्या शैक्षनिक नावलोकिक करणार्‍या महाविद्यालयाची बदनामी केल्यामुळे आम्ही त्यांना कॉलेजमध्ये नेऊन तोंडाला काळं फासलं आणि धडा शिकवला अशी बाजूच सांळुखेंनी मांडली. याबाबत मात्र भाईकट्टी यांनी कोणालाही ओळखण्यास नकार दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • VINOD

    kaay bolnaar maar khaun dekhil olakhnyaas nakaar mhnaje great aahe haa manus shame shame

close